डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिकमधे नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघाचं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित

पॅरिस ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभाच्या एक दिवस आधी, आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर, आणि बी. धीरज, वैयक्तिक रँकिंग फेरीत भाग घेतला.

 

उपांत्यपूर्व फेरीत, भारताचा सामना यजमान फ्रान्स आणि नेदरलँड यांच्यात अंतिम-१६ टप्प्यात झालेल्या सामन्यातल्या विजेत्याबरोबर होईल. पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव भारताचं प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे उर्वरित टप्पे २८ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. रँकिंग फेऱ्यांनंतर, स्पर्धा मॅचप्लेच्या टप्प्यात प्रवेश करेल.

 

पॅरिस ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा भारतीय वेळेनुसार उद्या रात्री ११ वाजता सुरु होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा