डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 11, 2024 10:51 AM | Women Cricket

printer

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ५० षटकांचा महिला क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना

महिला क्रिकेटमध्ये, पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पर्थमधील मैदानावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत आधीच २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी पहिला सामना पाच गडी राखून आणि दुसरा सामना १२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. हे दोन्ही सामने ब्रिस्बेन इथे झाले होते. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया व्हॉल आतापर्यंत मालिकेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू असून तिने दोन सामन्यांत १४७ धावा केल्या, तर मेगन शुट हिने सर्वाधिक सहा गडी बाद केले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा