डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार

पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे.

 

दरम्यान, ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी आज भारताची नारीशक्ती मैदानात उतरणार आहे. तिरंदाजी, मुष्टियुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर्धांमध्ये आज भारतीय महिला खेळाडू सहभागी होतील. तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात दीपिका कुमारी आणि भजन कौर लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील. नेत्रा कुमनन नौकानयन स्पर्धेत सहभागी होईल. तर पुरुषांच्या गटात नौकानयनपटू विष्णू सर्वनन, गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत कौर, तर मुष्टियुद्ध स्पर्धेत निशांत देव पदकांच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

 

दरम्यान, स्पर्धेचा कालचा सातवा दिवस भारतासाठी आशादायक ठरला. बॅडमिंटन पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. पुरुष हॉकी संघानं ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३-२ अशी मात केली. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या ग्रेट ब्रिटनशी होणार आहे.

 

तिरंदाजी मिश्र सांघिक प्रकारात धीरज बोम्मदेवर आणि अंकिता भगत यांचं कास्यपदक थोडक्यात हुकलं. पारुल चौधरी आणि अंकिता ध्यानी या दोघींनाही महिलांच्या ५ हजार मीटर स्पर्धेची, तर ताजिंदरपाल सिंह तूर याला पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा