ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक झाल्याने पाकिस्तानात अडकलेली एक भारतीय महिला २२ वर्षांनी मायदेशी परतली आहे. हमीदा बानो असं या महिलेचं नाव असून त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अटारी सीमेवर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर हमीदा यांना वैद्यकीय उपचारांसाठी अमृतसर इथल्या गुरुनानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ट्रॅव्हल एजंटने नोकरीचं आमीष दाखवून त्यांची फसवणूक केल्याने त्या पाकिस्तानमधे सिंध प्रांतातल्या हैदराबाद इथे अडकल्या होत्या. आपण मायदेशी परतू अशी कल्पनाही केली नव्हती, पण वर्षभरापूर्वी भारतीय दूतावासाने आपल्याशी संपर्क साधल्याने आपण परतू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Site Admin | December 17, 2024 6:42 PM | Pakistan