झिम्बाव्बे विरुद्धच्या टी – ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं शेवटच्या षटकापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात उतरला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं झिम्बाब्वेला फलंदाजीला पाचारण केलं. झिम्बाब्वेकडून कुठलाही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. निर्धारित २० षटकात झिम्बाब्वेनं ९ बाद ११५ धावा केल्या. रवि बिश्नोईनं सुरेख गोलंदाजी करत चार गडी बाद केले.
११६ धावांच लक्ष्य घेऊन आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि अवधेश खान वगळता एकाही खेळाडूला दोन आकडी धावा करता आल्या नाही. १९ षटक आणि ५ चेंडूत भारताचा पूर्ण संघ १०२ धावांवर बाद झाला.
Site Admin | July 6, 2024 8:17 PM | झिबाब्वे | टी ट्वेंटी क्रिकेट | भारत