डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ISL Football : केरला ब्लास्टर क्लबचा ओदिशावर ३-२ असा विजय

फूटबॉलच्या इंडियन सुपर लीग मध्ये काल झालेल्या सामन्यात केरला ब्लास्टर फूटबॉल क्लबने ओदिशा फूटबॉल क्लबवर ३-२ असा विजय मिळवला. ब्लास्टरने शेवटच्या अर्ध्या तासात तीन गोल करत  बाजी मारली. जेरी मविहमिंगथांगाने ओदिशाला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली होती.  साठाव्या मिनिटाला क्वामे पेपराहने गोल करत बरोबरी साधेपर्यंत ओदिशाने सामन्यावर पकड कायम ठेवली होती. जेसस जिमनेज याने ७३व्या मिनिटाला गोल करत केरळला आघाडी मिळवून दिली. पण, ८०व्या मिनिटाला ओदिशाने गोल करत बरोबरी साधली. शेवटच्या तीस मिनिटात तिसरा गोल करत केरळने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

 

आता केरळचा सामना नॉर्थ ईस्ट युनायटेड शी १८ जानेवारी रोजी तर ओदिशाचा सामना बंगळुरूशी २२ जानेवारी रोज होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा