अमेरिकी फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात केलेल्या कर्जावरच्या व्याज दरकपातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ८५ हजाराची पातळी ओलांडली तर निफ्टीनेही २५ हजार ९७९ अंकांची विक्रमी वाढ नोंदवली.
Site Admin | September 24, 2024 2:38 PM