नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झालेली पहायला मिळाली. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशेहून अधिक अंकांनी घसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कर आणि शुल्क लावण्याच्या घोषणा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच जागतिक पातळीवर इंधन तेलांचे दर वाढत असल्यानं त्याचा एकंदर परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचं बाजार वर्तुळात बोललं जात आहे.
Site Admin | April 1, 2025 1:54 PM | आर्थिक वर्ष | शेअर बाजार
नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण
