डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 13, 2024 7:46 PM | Indian stock market

printer

देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ९८४ अंकांची घसरण झाली. आणि तो ७७ हजार ६९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२४ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५५९ अंकांवर बंद झाला.

 

सेन्सेक्स निर्देशांकातल्या ३० पैकी २७ कंपन्यांचे समभाग आज तोट्यात गेले. एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस या तीनच कंपन्यांचे समभाग काहीसे तेजीत राहिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा