आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे. भारतीय समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा यामुळेच संपूर्ण जग आपल्याकडे अपेक्षेनं पाहात आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आगामी काळ आयुर्वेदासाठी अनुकूल असून आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. दरम्यान नितीन गडकरी कालपासून पुणे भेटीवर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Site Admin | September 21, 2024 11:50 AM