रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे ४७६ गाड्यांचं नियोजन केले आहे. दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये ४ हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवल्या, ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. या महिन्याच्या ४ तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे.
Site Admin | November 7, 2024 3:10 PM | Indian Railway
भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार
