क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८ वा हंगाम असून १८ मे पर्यंत साखळी सामने रंगणार आहेत, तर २५ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
Site Admin | March 22, 2025 6:46 PM
IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना
