भारतीय वंशाच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी ही घोषणा केली. सुनीता विल्मम्स बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि कोनोनेन्को यांनी अंतराळात आठ दिवसांच्या मुक्कामासाठी यावर्षी ५ जून रोजी प्रवास सुरू केला होता. मात्र, अंतराळ ज्या यानातून ते दोघं गेले होते त्यात बिघाड झाल्याने त्यांचं पृथ्वीवर परतणं रद्द झालं. हे दोघं आता २५ फेब्रुवारी २०२५ ला पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | September 24, 2024 1:29 PM | Astronaut Sunita Williams | International Space Station