अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची कार्यपद्धती केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केली आहे. मानवी अवयवांचा पूर्ण उपयोग करून घेणं आणि त्यांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे अवयव उपलब्ध करून देणं हा या कार्यपद्धतीचा उद्देश असल्याचं आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. अवयव देणारा आणि घेणारा हे दोन रुग्ण जेव्हा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये असतात, तेव्हा हे अवयव एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावे लागतात. यासाठीची प्रक्रिया या कार्यपद्धतीमुळे सुलभ होणार आहे. नीती आयोग, संबंधित मंत्रालयं आणि या क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा करून ही कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे.