हिंदी महासागर क्षेत्रात सध्या भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू आहे. या द्वैवार्षिक सरावात भारतीय नौदलाच्या सर्व ऑपरेशनल युनिट्स बरोबरच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचा लक्षणीय सहभाग असतो. भारतीय नौदलाचं युद्धकौशल्य प्रदर्शित करणं, आणि तिन्ही सेनादलांच्या एकत्रित प्रतिसादानं देशाची सागरी सुरक्षा बळकट करणं हे या सरावाचं उद्दिष्ट आहे.
Site Admin | February 7, 2025 7:29 PM
भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू
