डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 2, 2024 2:51 PM | Indian Navy

printer

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाजं आणि पाणबुड्या दाखल होणार

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाज आणि पाणबुड्या सामील केल्या जातील असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं. ६२ जहाज आणि एक पाणबुडी निर्माणाधिन असून पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यात एक जहाज नौदलात सामील करून घेतलं जाईल असं त्रिपाठी म्हणाले. वार्षिक नौदल दिवसाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. ४ डिसेंबर रोजी ओदिशातल्या पुरी इथं नौदल दिवस साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल, असं त्रिपाठी  यांनी सांगितलं. भारत  हा शेजारी देशांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी  पूर्णपणे सज्ज आहे, असंही त्यांनी यावेळी  सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा