भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशात संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आजपासून चार दिवसांच्या यूएई दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते यूएईचे नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल पायलट सईद बिन हमदान अल नाह्यान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या भेटीचं उद्दिष्ट सर्वच क्षेत्रातल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या अनुषंगाने संरक्षण सहकार्य वाढवणं आणि द्विपक्षीय सागरी संबंध दृढ करणं असं आहे.