डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने काल ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर इथे शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात कमी उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं.
या क्षेपणास्त्राची प्रणाली भारतातच विकसित झाली असून यात रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, मल्टी फंक्शन रडार आणि वेपन कंट्रोल सिस्टिम बसवण्यात आले आहेत. या यशस्वी चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचं अभिनंदन केलं आहे.
ही प्राणील संरक्षण संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतेचा पुरावा असल्याचंही ते म्हणाले आहेत.