लंडन एक्ससेल इथ आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय पर्यटन मंत्रालाय सहभागी होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विमान कंपन्या आणि पर्यटन व्यवसायातील कंपन्यांचे प्रतिनिधी मिळून एकंदर 50 जणांचं भारतीय प्रतिनिधि मंडळ सहभागी होत आहे.
या प्रदर्शनातील भारतीय विभागात भारतीय संस्कृति, परंपरा यांच दर्शन घडवण्यात येणार आहे. विवाह पर्यटन, परिषदा आणि बैठका यासाठीचे आयोजन आणि महाकुंभ मेळा या दृष्टीने भारताला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून जगासमोर आणणे हे या वर्षीच्या महोत्सवात भारतीय पर्यटन विभागाचं उद्दिष्ट आहे.