नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्यफेरीत धडक मारली आहे. पुरुष संघानं श्रीलंका संघावर १००-४० अशी मात केली. रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला.
प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील महिला संघानं बांग्लादेश संघावर १०९-१६ असा विजय मिळवला. कालच्या सामन्यासाठी अश्विनी शिंदे सर्वोत्तम खेळाडू आणि ऋतुराणी सेन उत्कृष्ट बचाव खेळाडू ठरली.