कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून, या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगितलं आहे. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशनं निषेध केला आहे.
याप्रकाराची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने आपणहून घेतली असून, हे राज्यसरकारचं अपयश असल्याची टीका केली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या मुद्द्यावर देशभरात पत्रकार परिषदा, मोर्चे आणि निदर्शनं आयोजित करण्यात आली आहेत. भाजपा महिला विभागाच्या वतीनं आज कोलकत्यात मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे.