डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 19, 2024 7:47 PM | wheat

printer

गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरू

भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था कर्नाल यांनी आज केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरु केलं आहे. नवीन वाणांचं बियाणं घेण्यासाठी देशभरातल्या २२ हजार शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. गव्हाचं नवीन वाण अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोग प्रतिबंधक आहे. बार्ली वाण DWRV 137 चा देखील गव्हाच्या मान्यताप्राप्त वाणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यातल्या पेंढ्यामध्येही उपयोग करता येईल. गेल्या वर्षी ११३ पूर्णांक २९ दशलक्ष टन विक्रमी उत्पादन झालं होतं, परंतु यंदा त्याही पेक्षा अधिक ११५ दशलक्ष टन गहू उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं संस्थेचे संचालक डॉ. रतन तिवारी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा