पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा गोलफरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ७५ किलो वजनी गटात चीनच्या ली क्वियान हिनं टोक्यो ऑलिम्पिकची पदकविजेती लोव्हलीना बोर्गोहाइन हिचा ४-१ असा पराभव केला. नेमबाजीत २५ मीटर जलद फायर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत अनीश भनवाला आणि विजयवीर सिद्धू लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील. महिलांच्या ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या पहिल्या फेरीत पारूल चौधरी सहभागी होईल. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत जेस्विन आल्ड्रिन मैदानात उतरेल.