इराण- इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासानं इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा निर्देशांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सर्वांनी सावधगिरी बाळगावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहनही भारतीय दूतावासानं केलं आहे. भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून आणि सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, नागरिकांनी दूतावासाच्या अहोरात्र सुरू असलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असं सांगितलं आहे.