डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

व्हिएतनाममध्ये सायबर घोटाळे करणाऱ्यांच्या ताब्यातून ४७ भारतीयांची सुटका

व्हिएतनाममध्ये लाओस इथल्या सायबरकेंद्रामध्ये अडकलेल्या सत्तेचाळीस भारतीयांना भारतीय दूतावासाने सोडवलं आहे. ही सायबर केंद्रे म्हणजे सायबर घोटाळे करणारी केंद्रे होती. 

बोकिओ परगण्यातल्या  गोल्डन ट्रँगल सेझमध्ये  ही केंद्रे  सुरु होती. भारतीय दूतावासाने त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती दिली आहे. या सेझ मधल्या बेकायदेशीर कृत्यांचा छडा लावल्यावर यापैकी २९ जणांना भारतीय दूतावासाच्या स्वाधीन करण्यात आलं तर १८ जणांनी स्वतः दूतावासाशी संपर्क साधला. भारतीय राजदूतांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यापैकी ३० जण मायदेशात परतले किंवा वाटेवर आहेत. तर सतराजण प्रवासाची सोय होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा