डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल अविर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून, संयुक्त अरब अमिरातीतल्या १५ हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित करण्यासाठी सहाय्य करण्यात आलं. चार महिने चाललेल्या या कार्यक्रमात भारतीय वाणिज्य दूतावासानं २ हजार ११७ पारपत्र आणि ३ हजार ५८९ आपत्कालीन प्रमाणपत्र जारी केली. या दरम्यान ३ हजार ७०० पेक्षा जास्त लोकांना युएई बाहेर पडण्याचे परवाने जारी केले. कार्यक्रमाच्या समाप्ती बरोबर, भारतीय वाणिज्य दूतावासानं युएइ सरकारच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि भारतीय नागरिकांनी युएई मध्ये प्रवेश, काम आणि निवास याबाबतच्या स्थानिक नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा