केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ सादर केलं. हे विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही विमानासाठी किंवा विमानांच्या श्रेणीसाठी, विमानाच्या ऑपरेशनच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही हवाई अपघाताच्या किंवा घटनेच्या तपासासाठी नियम बनविण्याचे अधिकार देते. विमान कायदा १९३४ मध्ये आणला गेला आणि त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) यांसारख्या संस्थांच्या कार्यप्रणालीत संदिग्धता आणि विरोधाभास निर्माण झाले. हा गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय वायुयान विधेयक आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | August 8, 2024 6:45 PM | Indian Aviation Bill 2024 introduced in Lok Sabha | Loksabha