पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवशी कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात आहेत. कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कास्यपदक पटकावण्याच्या उद्देशाने अमन सेहरावत आज रात्री लढत देईल. गोल्फमध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचा तिसऱ्या फेरीचा सामना सध्या सुरू आहे. दरम्यान, ॲथलेटिक्समध्ये महिला आणि पुरुष संघ ४०० मीटर रिले स्पर्धेत पुढच्या फेरीत जाण्यात अयशस्वी ठरले. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं काल रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कास्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राशी संवाद साधला आणि रौप्यपदक पटकावल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं.
Site Admin | August 9, 2024 7:30 PM | #ParisOlympics2024. | Paris