डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2024 8:18 PM | Paris Olympics 2024

printer

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं आयोजित समारंभात केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीसाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना ३० लाख रुपये बक्षीस देण्यात आलं.