डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पुढच्या फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं पॅरिस महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१-५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला.

 

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानं सातवं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल्याने स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं. मुष्टियोद्धा लोव्हलीना बोर्गोहाइन हिनं नॉर्वेच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

 

टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला हिनं झेंग जियान हिचा पराभव केला. आता तिचा पुढचा सामना अग्रमानांकित चीनच्या सुन यिंगशा हिच्याशी होणार आहे. तिरंदाजीत दीपिका कुमारी हिनंही पुढच्या फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. या स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंत दोन कास्यपदकं पटकावली आहेत आणि ही दोन्ही पदकं नेमबाजीतली आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा