भारत आणि सिंगापूरच्या सैन्याचा देवळाली इथं सुरू असलेला तीन दिवसीय संयुक्त सराव आज संपला. सिंगापूर दारुगोळा विभागाच्या १८२ सैनिकांनी तर भारतीय सैन्यातल्या दारुगोळा रेजिमेंटच्या ११४ सैनिकांनी या सरावात सहभाग घेतला. दोन्ही सैन्यांच्या तोफखान्यांद्वारे संयुक्त शस्त्र नियोजन, अद्ययावत शस्त्रास्त्रांच्या वापराची प्रात्यक्षिकं या सरावात सादर करण्यात आली. उभय देशांचे उच्चाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Site Admin | November 30, 2024 7:00 PM