भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समर्थ भारत, सक्षम सेना या संकल्पनेअंतर्गत लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात आयोजित केलेल्या नो युवर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते. या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षणक्षेत्रातले स्टार्टअप यासह नवोन्मेष क्षेत्रात सुरू असलेलं प्रचंड काम बघायला मिळत आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. या उपक्रमाद्वारे नागरिकांना जवानांशी संवाद साधता येईल, युवकांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Site Admin | January 4, 2025 2:37 PM | CM Devendra Fadnavis