भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस अँजेलिस मध्ये आज झालेल्या ६७ व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकनं मिळवणारी बियॉन्स हिचा काउ बॉय कार्टर हा आल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकनं मिळवणारी कलाकार असा इतिहासही तिनं यासोबत रचला. सबरीना कार्पेन्टर हिनं आपल्या कारकिर्दीतला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. केन्ड्रिक लॅमर , बीटल्स, डोएची या कलाकारांनीही पुरस्कारावर आपली नावं कोरली.
Site Admin | February 3, 2025 2:49 PM | Grammy Award | singer Chandrika Tandon | Triveni
भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार
