डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅराऑलिम्पिंकमध्ये भारताला उंच उडीमध्ये रौप्य, तर धावण्यात कास्यपदक

 

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पाल हिनं महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी पदकतालिकेत आणखी भर पडण्याची आशा आहे. तिरंदाज शीतल देवी आणि राकेश कुमार, धावपटू दीप्ती जीवनजी, भालाफेकपटू सुमित अंतिल, थाळीफेकपटू योगेश कथुनिया यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

 

बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताला पदकं मिळण्याची आशा आहे. पुरुष एकेरीत सुहास यतिराजनं देशबंधू सुकांत कदमला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. महिला एकेरीत तुलसीमती मृगेशन आज सुवर्णपदकासाठी चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी लढत देईल, तर मनीषासमोर कास्यपदकासाठी डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटूचं आव्हान असेल. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत सात पदकं पटकावली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्यपदकांचा समावेश आहे.