डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 31, 2024 11:22 AM | Paris Paralympics

printer

पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखराची सुवर्ण पदकाला गवसणी

पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं अशी चार पदकं मिळवली. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग प्रकारात आज भारताच्या अवनी लेखरानं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. तिनं २४९ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालनं २२८ पूर्णांक ७ दशांश गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावलंं. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात मनीष नारवालने रौप्यपदक जिंकलं.

 

महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या प्रीति पालनं कांस्यपदक मिळवलं. १४ . २१ सेकंदांची वेळ नोंदवत तिनं वैयक्तिक सर्वाेत्तम कामगिरी केली.  बॅडमिंटनमधे भारताच्या नितेश कुमारनं पुरूष एकेरीच्या एसएस ३ प्रकारात चीनच्या यांग जिआनहुआनला २१-५, २१-११ असं सरळ गेममधे नमवत उपांत्य फेरीत धडक मारली. चारजणांच्या ग्रुप ए मधे दुसरा विजय मिळवून तो या गटात दुसऱ्या स्थानावर आला. दोन गटातले पहिले दोन खेळाडू उपांत्य फेरीत दाखल होत असल्यामुळे त्यानं ही फेरी गाठली. सुहास यथिराजनंही दक्षिण काेरियाच्या क्यु वान शिनला सरळ गेममधे पराभूत करत पुरूष एकेरी एसएल ४ प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.    

सर्वाधिक वाचले

सर्व पहा