अमेरिकेत कोलोरॅडो इथं झालेल्या १९ वर्षाखालील जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिलांच्या गटात चार सुवर्णांसह १७ पदकं मिळवली. १९ खेळाडूंच्या भारतीय संघात १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले, प्रत्येक महिला खेळाडूने पदक जिंकलं. चार सुवर्णपदक विजेत्यांमध्ये हेमंत सांगवान आणि महिला खेळाडू क्रिशा वर्मा, पार्थवी ग्रेवाल आणि वंशिका गोस्वामी यांचा समावेश होता.
Site Admin | November 4, 2024 1:46 PM | US
अमेरिकेत झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला ४ सुवर्णांसह १७ पदकं
