कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.
मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.
भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशिकुमार मेनन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ. मयुरी रेगे, आयआयटी पवईचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोदा एम. एस. विद्यापीठाचे डॉ. देवेश सुथर यांनी केलं.
या स्पर्धेत एकंदर ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.