भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 7 टक्के दराच्या आधारे बोलत होते. या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के, अमेरिकेचा अंदाजे 2 पूर्णांक 6 टक्के इतका आहे. तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये इंडोनेशिया, तुर्की, रशिया, पोलंड, स्पेन आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात 2024-25 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज 6 पूर्णांक 8 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
Site Admin | August 28, 2024 9:46 AM | India | Minister Ashwini Vaishnav