भारताची २०३५ पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचं अंतराळस्थानक उभारण्याची योजना आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल सांगितलं. भारताची २०४० पर्यंत चंद्रावर उतरण्याचीही योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीत विज्ञान क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांच्या आजवरच्या कामगिरीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं अंतराळ क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत ४३२ परदेशी उपग्रह भारतातून प्रक्षेपित केले असल्याचं ते म्हणाले आणि त्यातले नव्वद टक्के उपग्रह गेल्या दहा वर्षांमध्ये प्रक्षेपित झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जैवतंत्रज्ञान, जैव-अर्थव्यवस्था, संरक्षण आणि कृषी या क्षेत्रांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून भारतानं मोठी भरारी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.
Site Admin | December 12, 2024 2:21 PM | Dr. Jitendra Singh | space station