महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारताने ९ – ० असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे भारत उपांत्यफेरीत पोहोचला, तसंच पुढच्या वर्षी चिलीमधे होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ गट जागतिक हॉकी स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे. आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होईल. दुसरा उपान्त्य सामना चीन आणि दक्षिण कोरियामधे होणार आहे.
Site Admin | December 14, 2024 1:46 PM | Women's Junior Group Hockey Asia Cup