ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत, भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल जपानच्या संघाचा ३-१ असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली. भारताच्या दीपिकानं २ तर मुमताजनं १ गोल केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीन आणि दक्षिण कोरिया दरम्यान होणार असून, त्यातील विजेत्या संघाशी अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना होणार आहे.
Site Admin | December 15, 2024 1:42 PM | Hockey | Oman
महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवून भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
