डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ – ० असा दणदणीत पराभव केला.

 

अ गटात झालेल्या इतर सामन्यात मलेशियानं थायलंडला ३-० असं पराभूत केलं. ब- गटातल्या सामन्यात जपाननं श्रीलंकेचा १५-० नं पराभव केला. पुढच्या वर्षी चिली देशात होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ हॉकी विश्व कप स्पर्धेची पात्रता फेरी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ तारखेला होणार असून स्पर्धेतले सर्वोत्तम ५ संघ कनिष्ठ विश्व कप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा