नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं कालपासून स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय तरूण जग काबीज करण्यास उत्सुक आणि सज्ज असल्याचं ते म्हणाले. या आवृत्तीत ३ हजारांहून अधिक स्टार्टअप्स, एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार आणि व्यवसाय विकास संस्था आणि ५० हून अधिक देशांतील सुमारे दहा हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
Site Admin | April 5, 2025 2:44 PM | पियुष गोयल | भारत मंडपम् | स्टार्टअप महाकुंभ
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल – पियुष गोयल
