संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. ऑस्ट्रियाची राजधानी विएना इथं संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभु कुमारन यांनी काल आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. भारताला पहिल्यांदाच या आयोगाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं आहे. हा आयोग जागतिक स्तरावर अंमली पदार्थांविषयी प्रकरणांवर लक्ष ठेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सदस्य राष्ट्रांना धोरण ठरवण्यासाठी मदत करत असतो.
Site Admin | December 7, 2024 2:07 PM | अंमली पदार्थ नियंत्रण आयोग | भारत | संयुक्त राष्ट्संघ
संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार
