‘एक देश एक निवडणूक’ पद्धतीचा भारताला खूप मोठा फायदा होईल असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली एक देश एक निवडणूक या विषयावर ३० व्या लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानात बोलत होते. एक देश एक निवडणूक पद्धतीमुळे उत्तम प्रशासन, धोरणात्मक स्थिरता, सामाजिक एकोपा, आर्थिक वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल असंही कोविंद यांनी यावेळी सांगितलं. एकाच वेळी निवडणूक घेतल्यास अधिक समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी मूलभूत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने या संदर्भातील अहवाल नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता.
Site Admin | October 6, 2024 1:52 PM | Former President Kovind