भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात आज ताश्कंद इथं द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि उझबेकिस्तानचे उपप्रधानमंत्री खोडजायेव जमशीद अब्दुखाकिमोविच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातल्या उझबेकिस्तानी गुंतवणूकदारांना आणि उझबेकिस्तानमधल्या भारतीय गुंतवणूकदारांना योग्य संरक्षणाची हमी या करारात दिली आहे. तसंच यात लवादाद्वारे विवाद मिटवण्यासाठी स्वतंत्र मंचाची तरतूदही आहे.
Site Admin | September 27, 2024 8:12 PM