डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 27, 2024 1:25 PM | India | US

printer

बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार

भारतातून अमेरिकेत चोरुन नेलेल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, प्राचीन मुर्ती, पूरातन आणि पारंपरिक वस्तूं संदर्भात भारत आणि अमेरिकेत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देशातल्या अवैध व्यापार, निर्यात आयात आणि पूरातत्व वस्तूंच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. भारताचा अमेरिकेबरोबर करण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे. 

आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी ही माहिती दिली. हा करार ऐतिहासिक असल्याचं ते यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा