भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या असून यामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. या बैठकांमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व सह सचिव नागराज नायडू यांनी तर अमेरिकेच्या प्रतिनिधींचं नेतृत्व डोनाल्ड लू यांनी केलं.
Site Admin | September 18, 2024 1:00 PM | India | US