अमेरिकेने लादलेल्या अतिरीक्त आयात शुल्काचे काय परिणाम होतील याची पडताळणी भारत करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न करत आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. भारतासाठी अमेरिकेसोबतची जागतिक धोरणात्मक भागीदारी महत्वाची असून त्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले.
Site Admin | April 9, 2025 8:15 PM | India | US
भारत – अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
