११० हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना म्हणाले. देशभरातल्या स्टार्टअप पैकी ४३ टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली. जगभरात भू राजकीय ताणतणाव असूनही भारताची वाढती निर्यात लवकरच ८०० बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याचा टप्पा गाठेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
Site Admin | January 3, 2025 8:15 PM | India | Minister Piyush Goyal